महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जिल्हा प्रशासनाचे काम उल्लेखनीय – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम

नाशिक, दि. २६ (जिमाका): महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी  नाशिक जिल्हा प्रशासनाने केलेले नियोजन, मतदानाची वाढलेली टक्केवारी व केलेले काम उल्लेखीनय आहे, अशा शब्दात मख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी कौतुक केले.

IMG 20241126 WA0155 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जिल्हा प्रशासनाचे काम उल्लेखनीय – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम

यावेळी बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांच्यासह 15 विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रत्यक्ष व ई-उपस्थित होते.

IMG 20241126 WA0157 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जिल्हा प्रशासनाचे काम उल्लेखनीय – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम

श्री. एस.चोक्कलिंगम यांनी  जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या संवाद साधत निवडणूक कामकाज संदर्भात आलेला अनुभव, त्यांना आलेल्या अडचणी याबाबत सविस्तर चर्चा केली व मार्गदर्शक सूचनांचे स्वागत केले.

०००

 

The post महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जिल्हा प्रशासनाचे काम उल्लेखनीय – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम first appeared on महासंवाद.