महाराष्ट्र सुपर मॉडेलचा महाअंतिम सोहळा संपन्न

महाराष्ट्र सुपर मॉडेल | पुणे – पुण्यातील ग्रोथ प्रोडक्शनच्यावतीने महाराष्ट्र सुपर मॉडेल सिझन – टू या शोचा महाअंतिम सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे आयोजन चिंचवड येथील वी हॉटेलमध्ये करण्यात आले होते. यामध्ये विविध गटातील सुमारे 50 ते 60 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला. यामध्ये मिस, मिसेस, मिस्टर किड्स, टिन्स अशा पाच स्पर्धा गटांत मुंबईतील पाचही कलाकारांनी महाराष्ट्र फॅशन शो स्पर्धेमध्ये बाजी मारली. सदर स्पर्धेसाठी आकाश पंदे, श्रीकांत आव्हाड यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले तर अश्विनी डोके, जयेश पाटील यांनी स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून उत्तम प्रकारे आपली भूमिका बजावली. स्पर्धा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा सिंग यांनी केले.

या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून रेडिओ सिटीचे आर. जे. सुमित तथा सिने अभिनेता पार्थ भालेराव, सिने अभिनेता सुमंत शिंदे आदींची प्रामुख्याने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे दिग्दर्शन रवी वाघमारे यांनी केले तर साई काळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समन्वयक म्हणून प्राजक्ता वाघमारे, दिपाली केदारी, विकी वाघमारे, विवेक गोंडा, गुरुदास भोंडवे रवी गुद्गुडे आदींचे सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी प्रायोजकत्व म्हणून पूजा रेड्डी, तृ्प्ती कोठारी, अंकुश श्रीमल, नम्रता काळे, निहाल मोमिन, सचिन आर्टस आदींचे विशेष आभार मिळाले.

महाराष्ट्र सुपर मॉडेल फॅशन शो सीझन-2 निकाल

किड्स कॅटेगरी

धानी देवरे (मुंबई ) – प्रथम क्रमांक

ऋतुजा पाटील (पुणे) – द्वितीय क्रमांक

टिन्स कॅटेगरी

तनिष्का कोल्हापूरकर (मुंबई) प्रथम क्रमांक

काव्या सोनेटा (पनवेल) द्वितीय क्रमांक

रिया देशमुख (मुंबई) तृतीय क्रमांक

मिस्टर कॅटेगरी

दानीश राजपूत (मुंबई) प्रथम क्रमांक

समिर कांबळे (पुणे) द्वितीय क्रमांक

रोहन मंदरे (सातारा) तृतीय क्रमांक

मिसेस कॅटेगरी

रिचा खन्ना (मुंबई) प्रथम क्रमांक

दिक्षा गायकवाड (पुणे) द्वितीय क्रमांक

स्नेहल गवारे (पुणे) तृतीय क्रमांक

मिस कॅटेगरी

जान्हवी कदम (मुंबई) प्रथम क्रमांक

केनिशा सोनिटा (मुंबई) द्वितीय क्रमांक

साधना भोर (चाकण) तृतीय क्रमांक

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.