माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाने देशाने प्रशासक, अर्थतज्ञ गमावला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, २६ डिसेंबर : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाने देशाने एक उमदा प्रशासक, अर्थतज्ञ गमावला आहे, अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री, पंतप्रधान अशा विविध भूमिकांमधून त्यांनी काम केले आणि देशवासियांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. भारताच्या राजकारणात स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अर्थशास्त्राशी संबंधित विपूल लेखन सुद्धा त्यांनी केले. त्यांनी केलेले कार्य कायम देशवासियांच्या स्मरणात राहील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि चाहत्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना लाभो, अशी मी प्रार्थना करतो.

०००

The post माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाने देशाने प्रशासक, अर्थतज्ञ गमावला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस first appeared on महासंवाद.