मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील खर्च सादर न करणाऱ्या दोन उमेदवारांना नोटीस

मुंबई, दि. १४ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने २७- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च नोंदवहीची खर्च निरीक्षकांसमोर 13 मे २०२४ रोजी द्वितीय तपासणी करण्यात आली. 21 उमेदवारांपैकी १९ उमेदवारांनी आपले खर्च सादर केले. दोन उमेदवारांनी तपासणीसाठी खर्च सादर केले नाहीत.

तपासणीसाठी खर्च सादर केलेले नाहीत, असे मनोज श्रावण नायक, कपिल कांतिलाल सोनी यांना नोटीस देण्यात आली आहे. तसेच उमेदवार रवींद्र वायकर यांना खर्चातील तफावतीबाबत नोटीस देण्यात आली आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

०००