मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात ३५ मतदारांनी बजावला गृह मतदानाचा हक्क

मुंबई, दि. १३ : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २८ – मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदारसंघात आतापर्यंत २३०९ मतदारांनी टपाली पद्धतीने मतदान केले आहे. तसेच, ज्येष्ठ ३३ तर दिव्यांग २ मतदारांनी असे एकूण ३५ मतदारांनी गृहमतदान केले असल्याची माहिती, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली.

२८- मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातील ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांसाठी गृहमतदान घेण्यात आले. १९० पैकी ३३ ज्येष्ठ नागरिक आणि दोन दिव्यांग अशा ३५ मतदारांनी मतदान केले आहे, तर, २८ – मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात २३०९ मतदारांनी टपाली पद्धतीने मतदान केले आहे. धुळे मतदारसंघासाठी २२ मतदारांनी टपाल पद्धतीने मतदान केले. दिंडोरीसाठी १० मतदारांनी, नाशिकसाठी ३१, पालघरसाठी ३९, भिवंडीसाठी २४२, कल्याणसाठी २३७, ठाणेसाठी २१०, मुंबई उत्तरसाठी – ७३, मुंबई उत्तर पश्चिमसाठी – ७५, मुंबई उत्तर पूर्वसाठी – ८१६, मुंबई उत्तर मध्यसाठी – १५२, मुंबई दक्षिण मध्यसाठी – ३०६, मुंबई दक्षिणसाठी ९६ असे एकूण २३०९ मतदारांनी मतदान केले आहे.

०००