मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी परवीनकुमार थिंड यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती

मुंबई उपनगर, दि. 5 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 29- मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाने भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी परवीनकुमार थिंड यांची नियुक्ती केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी ही माहिती दिली.

निवडणूक निरीक्षक श्री. थिंड यांचा पत्ता असा : निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, २९-मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ, जिल्हाधिकारी कार्यालय, पाचवा मजला, प्रशासकीय इमारत, सरकारी वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०००५१, मोबाईल क्रमांक +९१ ८९२८५७१२५३ असा आहे.

दरम्यान, निवडणूक निरीक्षक श्री. थिंड यांनी आज दुपारी आढावा बैठक घेतली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मुळे यांच्यासह पोलिस अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, खर्च पथक प्रमुख आदी उपस्थित होते. या बैठकीत निवडणूक निरीक्षक श्री. थिंड यांनी नामनिर्देशन व्यवस्था, (ETPBMS) इटीपीबीएमएस वेळापत्रक, घरपोच मतदान, पोस्टल बॅलेट मतदान, मतदानाच्या तयारीचा आढावा घेत त्यांनी विविध सूचना केल्या.

00000