मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबई, दि.२६:  मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार झिशानबाबा सिद्दिकी, स्वातंत्र्य सैनिक, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, अप्पर जिल्हाधिकारी मनोज गुहाड, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष बागुल, उपजिल्हाधिकारी संदीप निचीत, अंजली भोसले,  तेजस समेळ, उप विभागीय अधिकारी भागवत गावंडे, तहसिलदार सचिन चौधर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या नवं संकल्पनांचा शोध घेणे व त्यांचे उद्योजकतेचे स्वप्न साकार करण्यासाठी योग्य ते पाठबळ पुरवणे यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मार्फत ‘महाराष्ट्र स्टुडन्ट चॅलेंज’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई उपनगर जिल्ह्यातील विजेत्या १० उमेदवारांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व १ लक्ष रुपयांचा धनादेश देऊन  सत्कार करण्यात आला. यावेळी स्काऊट गाईड आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी पथ संचलन करुन मान्यवरांना मानवंदना दिली.

०००