मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निरीक्षक मतदारसंघात दाखल

मुंबई, दि. ३ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ करिता मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी भारत निवडणूक आयोगाने सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक आणि कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. हे सर्व निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांनी आपापल्या लोकसभा मतदारसंघात निवडणूकविषयक बाबींचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांना संपर्क साधण्यासाठी या निवडणूक निरीक्षकांचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी सर्वसाधारण निरीक्षक राजीव रंजन

३१ – दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी सर्वसाधारण निरीक्षक म्हणून राजीव रंजन (भा.प्र.से.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री.रंजन यांचा निवासाचा पत्ता सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथील कक्ष क्रमांक २०९ असा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ९९२०७९३६७६ आणि ई-मेल आयडी generalobservermum31@gmail.com हा आहे. श्री. रंजन यांचे  संपर्क अधिकारी नितीन काळे असून त्यांचा संपर्क क्रमांक ८००७००९००१ हा आहे. सर्वसाधारण निरीक्षक श्री. रंजन यांना सह्याद्री अतिथीगृह येथे उमेदवार व नागरिकांनी भेटण्याची वेळ  सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत असणार आहे.

मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघासाठी सर्वसाधारण निरीक्षक गौरीशंकर प्रियदर्शी

३० – मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघासाठी सर्वसाधारण निरीक्षक म्हणून गौरीशंकर प्रियदर्शी (भा.प्र.से.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. प्रियदर्शी यांचा निवासाचा पत्ता सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथील कक्ष क्रमांक २०६ असा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ९३७२५१८४२९ आणि ई-मेल आयडी 30mscgeneralobserver@gmail.com हा आहे. श्री. प्रियदर्शी यांचे  संपर्क अधिकारी चंद्रशेखर गवाणकर असून त्यांचा संपर्क क्रमांक ९४२२००३६७९ हा आहे. सर्वसाधारण निरीक्षक श्री. प्रियदर्शी यांना सह्याद्री अतिथीगृह येथे उमेदवार व नागरिकांनी भेटण्याची वेळ  सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत असणार आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी मुकेश सिंह पोलीस निरीक्षक

मुंबई शहर जिल्ह्यातील ३० – मुंबई दक्षिण मध्य मुंबई व ३१ -मुंबई दक्षिण या दोन लोकसभा मतदारसंघासाठी मुकेश सिंह (भा.पो.से.) यांची निवडणूक पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. सिंह यांचा निवासाचा पत्ता सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथील कक्ष क्रमांक १०६ असा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ८१६९९५८६२४ हा आहे. तसेच श्री. सिंह यांचे संपर्क अधिकारी संतोष ठुबे असून त्यांचा संपर्क क्रमांक ९९६७८५२४४१ हा आहे. श्री. सिंह यांना सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई  येथे उमेदवार व भेटण्याची वेळ  सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत असणार आहे.

०००००

शैलजा पाटील/स.सं