मुंबई शहर जिल्ह्यात मतदार जनजागृती अभियानांतर्गत सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद     

मुंबईदि. १ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमांतर्गत मुंबई शहर जिल्ह्यात विविध ठिकाणी मतदार जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मुंबई शहर संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आज 1 मे 2024 रोजी मतदार जनजागृती अभियानांतर्गत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या सायकल रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

लोकसभा निवडणुकीसाठी नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करत विविध वयोगटातील 450 पेक्षा  अधिक सायकलस्वार  या रॅलीत सहभागी झाले होते. ही रॅली जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.

मुंबईतील वांद्रे म्हाडा कार्यालयापासून रॅलीला सुरुवात करण्यात आली. वांद्र्याच्या म्हाडा कार्यालयापासून चार विविध मार्गांवर ही रॅली काढण्यात आली. वांद्रे ते प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरिवलीवांद्रे ते अंधेरी क्रीडा संकुलवांद्रे ते एनसीपीए नरिमन पॉईंट आणि वांद्रे ते कालिदास सभागृहमुलुंड अशा चार मार्गांवर ही रॅली काढण्यात आली. या रॅली दरम्यान विविध ठिकाणी सहभागी सायकलस्वारांनी नागरिकांना मतदान करण्याचा संदेश दिला. सायकल रॅलीच्या माध्यमातून मतदारांना जागृत करण्यात मदत होत आहे. सहा वर्षांच्या सायकलस्वारापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत यात हौशी तसेच व्यावसायिक सायकलस्वारांचा उत्साहपूर्ण सहभागी झाले होते.

लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मुंबईत जनजागृती करण्यात येत आहे.

नवमतदार नोंदणीसह मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी मा.भारत निवडणूक आयोगाने सिस्टीमेटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्ररोल पार्टीसिपेशन (स्वीप) हे अभियान हाती घेतले आहे.

मुंबई शहर जिल्ह्यांतील दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी  संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्वीप’ च्या प्रमुख समन्वय अधिकारी फरोग मुकादम यांच्या प्रयत्नातून विविध उपक्रमाच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात येत आहे. रॅलीत मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारीकर्मचारी तसेच स्वीप चे पथक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीच्या समारोपप्रसंगी निवडक प्रतिनिधींना पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

***

शैलजा पाटील/विसंअ/