मुंबई शहर जिल्ह्यात ८५ वर्षांवरील १९२२ ज्येष्ठ नागरिक व १८७ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान

मुंबई, दि. १५ : भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता दि. २० नोव्हेंबर, २०२४ रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान केंद्रावर उपस्थित राहू शकत नसलेल्या व प्रपत्र १२ ड भरून दिलेल्या ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना टपाली मतदान पथकामार्फत गृह टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेत मुंबई शहर जिल्ह्यात १९२२ ज्येष्ठ नागरिक व १८७ दिव्यांग अशा एकूण २१०९ मतदारांनी आतापर्यंत गृह टपाली मतदान केले आहे.

ce40f00d 566f 41ea 8ccc 9f076b286797 मुंबई शहर जिल्ह्यात ८५ वर्षांवरील १९२२ ज्येष्ठ नागरिक व १८७ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान

मुंबई शहर जिल्ह्यात १३ नोव्हेंबरपासून ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांच्या गृह टपाली मतदानाला प्रारंभ करण्यात आला आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील २१३९ ज्येष्ठ नागरिक मतदार व २१७ दिव्यांग मतदार गृह टपाली मतदानासाठी पात्र ठरले आहेत. १६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत गृह टपाली मतदान घेतले जाणार आहे.

धारावी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण २१ पैकी २० ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर १२ पैकी ०९ दिव्यांग मतदारांनी अशा एकूण २९ मतदारांनी गृह टपाली मतदान केले.

ae2ed574 ecbc 4980 8b75 99e7ff25749e मुंबई शहर जिल्ह्यात ८५ वर्षांवरील १९२२ ज्येष्ठ नागरिक व १८७ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान

सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण २८ पैकी २३ ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर २७ पैकी १६ दिव्यांग मतदारांनी अशा एकूण ३९ मतदारांनी गृह टपाली मतदान केले.

वडाळा विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण २५८ पैकी २२९ ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर २४ पैकी २२ दिव्यांग मतदारांनी अशा एकूण २५१ मतदारांनी गृह टपाली मतदान केले.

a53c574b bdc6 4d42 b6df b22bfb59cc83 मुंबई शहर जिल्ह्यात ८५ वर्षांवरील १९२२ ज्येष्ठ नागरिक व १८७ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान

माहीम विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण ६२१ पैकी ५५८ ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर २५ पैकी २३ दिव्यांग मतदारांनी अशा एकूण ५८१ मतदारांनी गृह टपाली मतदान केले.

वरळी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण १२१ पैकी १११ ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर २० पैकी १९ दिव्यांग मतदारांनी अशा एकूण १३० मतदारांनी गृह टपाली मतदान केले.

62104331 a902 4acb 9653 3e140a131603 मुंबई शहर जिल्ह्यात ८५ वर्षांवरील १९२२ ज्येष्ठ नागरिक व १८७ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान

शिवडी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण २२६ पैकी २०१ ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर ३४ पैकी ३२ दिव्यांग मतदारांनी अशा एकूण २३३ मतदारांनी गृह टपाली मतदान केले.

भायखळा विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण १९० पैकी १६७ ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर ४२ पैकी ३९ दिव्यांग मतदारांनी अशा एकूण २०६ मतदारांनी गृह टपाली मतदान केले.

5998b0a3 3061 44c4 81ee 0b5c4c6546b0 मुंबई शहर जिल्ह्यात ८५ वर्षांवरील १९२२ ज्येष्ठ नागरिक व १८७ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान

मलबार हिल विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण २८६ पैकी २६९ ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर ११ पैकी १० दिव्यांग मतदारांनी अशा एकूण २७९ मतदारांनी गृह टपाली मतदान केले.

मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण ११८ पैकी १०३ ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर १३ पैकी ११ दिव्यांग मतदारांनी अशा एकूण ११४ मतदारांनी गृह टपाली मतदान केले.

8f7dac2a dede 48b5 b8f9 1f3ff5ab5f34 मुंबई शहर जिल्ह्यात ८५ वर्षांवरील १९२२ ज्येष्ठ नागरिक व १८७ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान

कुलाबा विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण २७० पैकी २४१ ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर ०९ पैकी ०६ दिव्यांग मतदारांनी अशा एकूण २४७ मतदारांनी गृह टपाली मतदान केले.

या सर्व मतदारांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्रपत्र १२ ड भरून जमा केले होते. प्रपत्र १२ ड भरून जमा केलेल्या अर्जदारांचे गृह टपाली मतदान घेण्यात आले आहे.

5b1504b2 85c0 460f aba0 1a46db8a1a02 मुंबई शहर जिल्ह्यात ८५ वर्षांवरील १९२२ ज्येष्ठ नागरिक व १८७ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान

००००

The post मुंबई शहर जिल्ह्यात ८५ वर्षांवरील १९२२ ज्येष्ठ नागरिक व १८७ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान first appeared on महासंवाद.