मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजमाता जिजाऊ माँसाहेब, स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई, दि. १२: स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांना त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.

वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनाच्याही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

०००