यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान

मुंबई, दि. 27 : राज्यातील व राज्याबाहेरील ज्या लेखकांनी मराठी भाषेत वाङ्मय निर्मिती केली आहे अशा लेखकांच्या उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार देण्यात येतात. यावर्षी विविध प्रकारांमध्ये 35 लेखकांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष राजा दीक्षित आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.

यावेळी विविध वाङ्मय पुरस्कार  प्रदान करण्यात आले. यामध्ये प्रकार- प्रौढ वाङ्मय : (पुरस्काराचे स्वरुप एक लाख रुपये रोख)

1) काव्य:  श्रीकांत ढेरंगे यांना कवी केशवसुत पुरस्कार, 2) नाटक/ एकांकिका: डॉ. रावसाहेब मुरलीधर काळे यांना राम गणेश गडकरी पुरस्कार, 3) कादंबरी: सुचिता खल्लाळ यांना हरी नारायण आपटे पुरस्कार, 4) लघुकथा: कीर्ती मुळीक यांना दिवाकर कृष्ण पुरस्कार,  5) ललितगद्य (ललित विज्ञानासह) : अरुण खोपकर यांना अनंत काणेकर पुरस्कार,  6) विनोद: नीलिमा क्षत्रिय यांना श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार 7) चरित्र : डॉ. राजेंद्र मगर यांना न.चिं.केळकर पुरस्कार 8) आत्मचरित्र : संजीव सबनीस यांना लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार 9) समीक्षा/ वाङ्मयीन संशोधन/ सौंदर्यशास्त्र/ ललितकला आस्वादपर लेखन: सत्यशील देशपांडे यांना श्री. के. क्षीरसागर पुरस्कार 10) राज्यशास्त्र/ समाजशास्त्र: नीलांबरी जोशी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार 11) इतिहास: पराग चोळकर यांना शाहू महाराज पुरस्कार 12) भाषाशास्त्र/ व्याकरण: डॉ. शैलजा बापट यांना नरहर कुरूंदकर पुरस्कार 13) विज्ञान व तंत्रज्ञान (संगणक व इंटरनेटसह) :  मिलिंद किर्ती यांना महात्मा जोतीराव फुले पुरस्कार 14) शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखन: मंदार मुंडले यांना वसंतराव नाईक पुरस्कार 15) उपेक्षितांचे साहित्य (वंचित, शोषित, पिडीत, आदिवासी, कष्टकरी, अनुसूचित जाती व नव बौद्ध इत्यादी) : हिरामण तुकाराम झिरवाळ यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार 16) अर्थशास्त्र व अर्थशास्त्र-विषयक लेखन: डॉ. गिरीश वालावलकर यांना सी.डी. देशमुख पुरस्कार 17) तत्त्वज्ञान व मानसशास्त्र: डॉ. अलका देव यांना ना.गो.नांदापूरकर पुरस्कार 18) शिक्षणशास्त्र: डॉ.गणपती कमळकर यांना कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार 19) पर्यावरण : अतुल देऊळगावकर यांना डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार 20) संपादित/ आधारित: संपादक डॉ.मंदा खांडगे, डॉ.स्वाती कर्वे, डॉ.विद्या देवधर, डॉ.कल्याणी दिवेकर यांना रा.ना.चव्हाण पुरस्कार 21) अनुवादित: अनुवादक अलका गरुड यांना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार तर 22) संकीर्ण (क्रीडासह) : जॉन गोन्सालविस यांना भाई माधवराव बागल पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बालवाङ्मय पुरस्कार प्रकार : (पुरस्काराचे स्वरुप 50 हजार रुपये रोख)

1) कविता:दासू वैद्य यांना बालकवी पुरस्कार 2) नाटक व एकांकिका: सुरेश शेलार यांना भा.रा. भागवत पुरस्कार  3) कादंबरी: सुभाषचंद्र वैष्णव यांना साने गुरूजी पुरस्कार 4) कथा (छोट्या गोष्टी, परिकथा, लोककथांसह) : नीलिमा करमरकर यांना राजा मंगळवेढेकर पुरस्कार 5) सर्वसामान्य ज्ञान (छंद व शास्त्रे): मालविका देखणे यांना यदुनाथ थत्ते पुरस्कार तर 6) संकीर्ण :  डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांना ना.धो. ताम्हणकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

वाङ्मय पुरस्कार प्रकार- प्रथम प्रकाशन : (पुरस्काराचे स्वरुप 50 हजार रुपये रोख)

1) काव्य : पुनीत मातकर यांना बहिणाबाई चौधरी पुरस्कार 2) नाटक/ एकांकिका : शार्दूल सराफ यांना विजय तेंडूलकर पुरस्कार 3) कादंबरी: माणिक पुरी यांना श्री.ना.पेंडसे पुरस्कार 4) लघुकथा: विवेक वसंत कुडू यांना ग.ल.ठोकळ पुरस्कार 5) ललितगद्य : आशालता दिनेश पडवेकर यांना ताराबाई शिंदे पुरस्कार तर 6) समीक्षा सौंदर्यशास्त्र: भरतसिंग पाटील यांना रा. भा. पाटणकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

वाङ्मय पुरस्कार प्रकार : (पुरस्काराचे स्वरुप एक लाख रुपये रोख) सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार:  विठ्ठल गावस यांना सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार प्रदान करण्यात आला.

0000

दीपक चव्हाण/विसंअ/