रविकांत तुपकरांचा ‘स्वाभिमान’ पुन्हा जागला, अठरा दिवसात घरवापसी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांचा ‘स्वाभिमान’ पुन्हा जागृत झाला असून अवघ्या अठरा दिवसातच त्यांनी घरवापसी केली आहे. 28 सप्टेंबर रोजी सदाभाऊ खोतांच्या रयत क्रांती सेनेमध्ये प्रवेश केलेल्या रविकांत तुपकर यांनी आज पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला आहे. कोल्हापूर येथे आज (16 ऑक्टोबर) त्यांनी राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत घरवापसी केली.

रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांच्याकडे २६ सप्टेंबरला राजीनामा दिला होता. आणि 28 तारखेला सदाभाऊ खोतांच्या संघटनेत प्रवेश केला होता. तुपकर हे गेली अनेक वर्षे शेट्टी यांच्या खांद्याला खांदा लावून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. ऐन निवडणुकीत त्यांनी शेट्टी यांची साथ सोडल्याने हा शेट्टी यांच्यासाठी मोठा धक्काअसल्याचं बोललं जात होतं. मात्र त्यांनी पुन्हा स्वाभिमानीत प्रवेश केल्याने शेट्टी यांची ताकत वाढली आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.