नवी दिल्ली, दि. 8 : संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती महाराष्ट्र सदन येथे आज साजरी करण्यात आली. महाराष्ट्र सदनातील कार्यक्रमात संत संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन करण्यात आले.
कॉपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार यांनी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी महाराष्ट्र सदनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
000
The post राजधानीत संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी first appeared on महासंवाद.