राजभवन येथील गणरायाचे कृत्रिम हौदात विसर्जन; राज्यपालांकडून बाप्पाला निरोप

मुंबई, दि. 12 : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या निवासस्थानी, राजभवन येथे स्थापन केलेल्या गणरायाचे बुधवारी (दि. 11) गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी राजभवन येथे कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले.

राज्यपालांनी कुटुंबातील सदस्य तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह गणरायाची आरती केल्यानंतर बाप्पाला निरोप दिला. गणेशमूर्ती विसर्जन करताना पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी मूर्तीचे समुद्रात विसर्जन न करता ते कृत्रिम हौदात करावे, अशी सूचना राज्यपालांनी केल्यामुळे मूर्तीचे विसर्जन हौदात करण्यात आले.

नाशिक मध्यवर्ती कैद्यांनी तयारी केली शाडूची मुर्ती

राज्यपालांच्या निवासस्थानी मांडलेली गणेशाची मूर्ती शाडूची होती. ही मूर्ती नाशिक येथील कारागृहातील कैद्यांनी तयार केली होती. विसर्जनाच्या वेळी राज्यपालांचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सहसचिव श्वेता सिंघल, परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000

Governor’s Eco-friendly Ganesh murti immersed in artificial pond

Governor bids farewell to Lord Ganesh 

Mumbai, Date 12  -The eco-friendly Ganesh, installed at the residence of Maharashtra Governor C. P. Radhakrishnan was immersed in an artificial pond at Raj Bhavan on the fifth day of Ganeshotsav on Wed (11 Sept).

The Governor bid farewell to Ganesh  after performing the aarti along with his family members and officers and staff of Raj Bhavan.

The Governor had desired that the Ganesh idol should be immersed in an artificial pond in order to prevent the pollution of sea water. Accordingly the murti was immersed in the neighbourhood artificial pond.

Principal Secretary to the Governor Pravin Darade, Joint Secretary Shweta Singhal, Comptroller Jitendra Wagh and other officers and employees were present.

The Ganesh idol installed at Raj Bhavan was made of clay. It was created by an inmate of the Nashik Central prison.