राजमाता जिजाऊ माँसाहेब, स्वामी विवेकानंद यांना मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. १२ : स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रालयात जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव रोशनी कदम, अवर सचिव रवींद्र पेटकर यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले.