राज्यस्तरीय माध्यम देखरेख व नियंत्रण कक्षाला विशेष निवडणूक निरीक्षकांनी भेट देऊन कामकाजाची केली पाहणी

मुंबई, दि. ४ : लोकसभा निवडणुका २०२४ च्या अनुषंगाने आज भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले राज्याचे विशेष निवडणूक निरीक्षक धर्मेंद्र एस गंगवार (सेवानिवृत्त भारतीय प्रशासकीय सेवा),विशेष निवडणूक  पोलीस निरीक्षक एम.के.मिश्रा (सेवानिवृत्त भारतीय पोलीस सेवा) यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील  राज्यस्तरीय माध्यम देखरेख व नियंत्रण कक्षाला भेट देवून येथील कामकाजाची पाहणी केली.

माध्यम नियंत्रण कक्षामार्फत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील सर्व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील बातम्यांचा दर दोन तासांचा तसेच मुद्रित माध्यमांचा अहवाल मुख्य मुख्य निवडणूक अधिकारी यांना सादर केला जातो. तसेच लोकसभा निवडणुका २०२४ च्या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी प्रचार व प्रसिध्दी केली जात असल्याचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक डॉ.राहुल तिडके यांनी  सांगितले.

लोकसभा निवडणुका २०२४ मध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी, निष्पक्ष आणि निर्भिडपणे वातावरणात मतदान व्हावे यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाने विविध माध्यमांव्दारे जनजागृती करावी. निवडणूक विभागामार्फत राबविण्यात येणा-या  विविध उपक्रमांना जास्तीत जास्त प्रसिध्दी द्यावी  अशा सूचना विशेष निवडणूक निरीक्षक यांनी केल्या.

यावेळी माध्यम नियंत्रण कक्षाचे  सहसचिव तथा अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन) हेमराज बागुल, संचालक (माहिती)(वृत्त व जनसंपर्क) डॉ.राहुल तिडके, सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे, अवर सचिव तथा उप मुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यावेळी उपस्थित होते.

००००

संध्या गरवारे/विसंअ