रायगड जिल्ह्यात २ हजार ६८० मतदारांनी बजावला गृह मतदानाचा हक्क

रायगड, दि. १७ (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व प्रमाणपत्र असलेल्या नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घरबसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यात दि.16 नोव्हेंबर अखेर पर्यंत एकूण 2 हजार 680 मतदारांनी गृह मतदानाचा हक्क बजावला.

WhatsApp Image 2024 11 16 at 44957 PM 1 रायगड जिल्ह्यात २ हजार ६८० मतदारांनी बजावला गृह मतदानाचा हक्क

पनवेल विधानसभा  मतदारसंघात  124 ज्येष्ठ नागरिक, 13 दिव्यांग अशा एकूण 137  मतदारांनी, कर्जत विधानसभा  मतदारसंघात 158 ज्येष्ठ नागरिक, 17 दिव्यांग अशा एकूण 175  मतदारांनी, उरण विधानसभा  मतदारसंघात 66 ज्येष्ठ नागरिक, 16 दिव्यांग अशा एकूण 82  मतदारांनी, पेण विधानसभा मतदारसंघात 545 ज्येष्ठ नागरिक, 58 दिव्यांग अशा एकूण 603, अलिबाग विधानसभा मतदारसंघात 442 ज्येष्ठ नागरिक, 27 दिव्यांग अशा  एकूण 469, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात  423 ज्येष्ठ नागरिक, 107 दिव्यांग अशा एकूण 530, महाड विधानसभा मतदारसंघात 571 ज्येष्ठ नागरिक, 113 दिव्यांग अशा एकूण 684 मतदारांनी गृह मतदानाचा हक्क बजावला.

WhatsApp Image 2024 11 16 at 44956 PM रायगड जिल्ह्यात २ हजार ६८० मतदारांनी बजावला गृह मतदानाचा हक्क

गोपनीय पद्धतीने मतदान करण्याची सुविधा पुरविण्यात येऊन  संबधित विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त करण्यात आलेल्या  क्षेत्रीय अधिकारी, मतदान अधिकारी तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी गृह मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. यावेळी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांनी निवडणूक आयोगाचे आभार मानले.

WhatsApp Image 2024 11 15 at 64133 PM 3 रायगड जिल्ह्यात २ हजार ६८० मतदारांनी बजावला गृह मतदानाचा हक्क

WhatsApp Image 2024 11 15 at 64133 PM 1 रायगड जिल्ह्यात २ हजार ६८० मतदारांनी बजावला गृह मतदानाचा हक्क

WhatsApp Image 2024 11 15 at 45321 PM रायगड जिल्ह्यात २ हजार ६८० मतदारांनी बजावला गृह मतदानाचा हक्क

WhatsApp Image 2024 11 15 at 64133 PM रायगड जिल्ह्यात २ हजार ६८० मतदारांनी बजावला गृह मतदानाचा हक्क

०००

The post रायगड जिल्ह्यात २ हजार ६८० मतदारांनी बजावला गृह मतदानाचा हक्क first appeared on महासंवाद.