लातूर येथे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्याकडून राष्ट्रध्वजास मानवंदना  

लातूर, दि. ०१ : महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथे मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. तसेच उपस्थितांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, प्रभारी अपर जिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे, अहिल्या गाठाळ, संगीता टकले, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.