मुंबई, दि. १३ : माजी मुख्यमंत्री व सहकार महर्षी वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विधानभवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे व डॉ. विलास आठवले यानी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी अवर सचिव सुरेश मोगल, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, सामाजिक कार्यकर्ते यशवंत हाप्पे, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्व. वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करून वंदन केले.
००००
The post वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन first appeared on महासंवाद.