सातारा, दि. १४: वाई विधानसभा मतदार संघातील महाबळेश्वर तालुक्यत मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत मेटतळे, हरोशी, जावली, दरे, नवेनगर, कुंभरोशी, कुमठे, पारसोंड, बिरवाडी, चतुरबेट, शिरवली, देवळी, दुधगांव या ठिकाणी मतदान जनजागृती रथाच्या माध्यमातून मतदारांमध्ये उत्साही वातावरणात मतदान विषयक जागृती करण्यात आली.
या गावांमध्ये मतदान करण्याविषयीचे विविध फलक घेऊन ज्येष्ठ नागरिक, महिला वप्राथमिक शाळेतील मुला-मुलींनी जनजगृती केली. तसेच या गावांमध्ये लहान मुलांनी साखळी तयार करुन येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान करण्याचे आवाहनही केले.
पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी मतदानाच्या दिवशी म्हणजेच येत्या 20 नोव्हेंबरला विविध ठिकाणी बंदोबस्तासाठी असतात. या अनुषंगाने पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आज पोस्टल मतदानाच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावला.
०००
The post वाई विधानसभा मतदार संघात फिरत्या चित्ररथातून मतदान जनजागृती first appeared on महासंवाद.