विनोद माहेश्वरी यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

मुंबई, दि. 12 : नवभारत समुहाचे मुख्य व्यवस्थापकीय संपादक विनोद माहेश्वरी यांच्या निधनाबददल राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

नवभारत हिंदी व नवराष्ट्र मराठी वृत्तपत्रांचे मुख्य व्यवस्थापकीय संपादक विनोद माहेश्वरी यांच्या निधनाचे वृत समजून दुःख झाले. विनोद माहेश्वरी हे उत्कृष्ट पत्रकार, मनमिळावू व्यक्ती व समाज सेवक होते.

आपले वडील, स्वातंत्र्य संग्राम सैनिक  स्व. रामगोपाल माहेश्वरी यांनी सुरु केलेल्या नवभारत दैनिकाला त्यांनी वेगळया उंचीवर नेले. त्यांच्या निधनामुळे राज्याने एक ध्येयनिष्ठ पत्रकार तसेच समाजसेवक गमावला आहे, असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी आपल्या शोक संदेशांत म्हटले आहे.

0000

 

Governor condoles demise of Vinod Maheshwari

Mumbai Dated 12 : Maharashtra Governor C.P. Radhakrishnan has expressed condolences on the demise of chief managing editor of Hindi daily Nava Bharat and Marathi daily Nava Rashtra Vinod Maheshwari.

In a condolence message the Governor has said:

“I was saddened to know about the passing of the chief managing editor of Nava Bharat group Vinod Maheshwari. He was a dedicated journalist, kind human being and a committed social worker. He took the Nava Bharat group founded by his illustrious father late Ramgopal ji Maheshwari to great heights.

In his demise, Maharashtra has lost a committed journalist and a social worker.”

000