विभागीय आयुक्तालयात संविधान उद्देशिकेचे वाचन

अमरावती, दि. 26 :  संविधानिक मुल्यांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने आज सकाळी विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.

यावेळी अपर आयुक्त संजय पवार, उपायुक्त गजेंद्र बावणे, संतोष कवडे, राजू फडके, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, सुशील आग्रेकर यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताने संविधान स्वीकारले. या घटनेला आज 75 वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय संविधान व त्यातील मुल्य, हक्क-अधिकार व कलम यासंबंधी सर्वांना माहिती होण्यासाठी शासनाने जिल्ह्यात संविधान मंदिरांची उभारणी केले असल्याचे सांगून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना श्रीमती पाण्डेय यांनी उजाळा दिला.

0000

The post विभागीय आयुक्तालयात संविधान उद्देशिकेचे वाचन first appeared on महासंवाद.