वेल्सच्या शिष्टमंडळाची विधानभवनाला भेट

मुंबई, दि.  28 : विधिमंडळाचे सध्या अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. विधिमंडळाची कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी इंग्लंडमधील वेल्सच्या शिष्टमंडळाने आज विधानभवनाला भेट दिली.

यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांचे स्वागत केले. या शिष्टमंडळात वेल्सचे फ्युचर जनरेशन्स कमिशनर डेरेक वॉकर, वेल्स ट्रिनिटी सेंट डेवीड विद्यापीठातील उपकुलगुरु कार्यालयाचे चीफ ऑफ स्टाफ डॉ. शोन ह्युजेस आणि विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन ॲण्ड ह्युमॅनिटीज शाखेचे अधिष्ठाता डॉ. जेरेमी स्मिथ यांचा समावेश होता. त्यांनी विधानसभा व विधानपरिषद गॅलरीमध्ये उपस्थित राहून कामकाज पाहिले.

000