“शिंदे गट निमित्त! भाजपने शिवसेना फोडली, देवेंद्र फडणवीसांनी बेत अमलात आणला”
मुंबई : एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मोठा संत्तासंघर्ष सुरू आहे. शिवसेनेच्या दोन प्रतिस्पर्धी गटांना निवडणूक आयोगाकडून नवीन नावे, चिन्हे देण्यात आली. शिवसेना फोडण्यात भाजप पक्ष यशस्वी झाला. एकनाथ शिंदे यांनी फक्त शिवसेना फोडली नाही तर शिवसेना आणि पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण देखील उद्धव ठाकरे यांच्यापासून दुर केले. दरम्यान शिवसेनेचे भविष्य, एकनाथ शिंदे यांच्यापुढील आव्हाने या सर्व प्रश्नावर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी बीबीसी मराठीला मुलाखत दिली यावेळी त्यांनी अनेक मोठे खुलासे केले.
शिवसेना संपली आहे का?
“कोणताही राजकीय पक्ष संपत नसतो, पक्ष फुटतो त्याचे वेगवेगळे गट होतात. पण पक्ष संतप नसतो. शिवसेना संपेल असे मला वाटत नाही आता दोन शिवसेना झाल्या आहेत. एक उद्धव ठाकरे यांची शिवसेना एक एकनाथ शिंदे यांची शिवसेना. पुढीत ५ ते १० वर्षात यांचे भवितव्य ठरेल. एकनाथ शिंदे यांची शिवसेना ज्याला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं आहे, हिचे पुढे काय होणार, यावर प्रश्नचिन्ह आहे. सुप्रिम कोर्टात खटला प्रलंबित आहे. शिंदे गटाने पक्षांतर कायदेशीर आहे की बेकायदेशीर याचा निर्णय घटनापीठाकडे यायचा आहे. त्यामुळे यांचे भवितव्य काय असेल हे सांगता येत नाही. शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे शिवसेना मवाळ होईल. तसेच शिवसेनेचे लोकशाहीकरण वेगात होईल,” असे निखिल वागळे म्हणाले.
शिवसेनेसाठी ही सर्वात मोठी कसोटी-
निखिल वागळे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर शिवसेनेसाठी ही सर्वात मोठी कसोटी आहे. ऐवढी मोठी फुट कधी पडलेली नव्हती. ५० आमदार सोडून गेले हे बाळासाहेबांच्या काळात शक्य नव्हतं. याबाबतीत बाळासाहेबांचा दरारा होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोर असलेले आव्हान ऐतिहासिक आहे. शिवसेनेसमोर पहिले आव्हान अंधेरी पूर्व पोटनिवडणूक आहे. त्यानंतर शिवसेनेसमोर असलेल्या दुसऱ्या आव्हानात (मुंबई महापालिका) भाजप आपली शक्ती पणाला लावेल.”
देवेंद्र फडणवीस यांनी बेत अमलात आणला-
“आता शिंदे गट निमित्त आहे. हे सर्व राजकारण भाजप करत आहे. भाजपने शिवसेना फोडली. देवेंद्र फडणवीस यांनी सगळा बेत अमलात आणला. मोदी आणि शहा यांच्या आदेशानुसार हे झाले. जेव्हा कोरोनाकाळात उद्धव ठाकरे गंभीररीत्या आजारी होते तेव्हा याची सुरुवात झाली. २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद स्विकारलं आणि काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर युती केली. तेव्हाच एकनाथ शिंदे नाराज झाले होते. पण ते पक्षातून बाहेर पडले नाहीत. उद्धव ठाकरे गंभीररीत्या आजारी आहेत आणि त्यांचा संपर्क कमी झाला आहे. याचा फायदा घेऊन भाजपने जाळे टाकले. एकनाथ शिंदे यांना त्या जाळ्याच ओढलं आणि शिवसेनेत फुट घडवून आणली. त्यामुळे एकनाथ शिंदे हा मुखवटा आहे. खरी लढाई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजपमध्ये आहे. पहीली लढाई अंधेरी पूर्वमध्ये होईल पुढची मुंबई महापालिकेची लढाई आहे,” असे निखिल वागळे यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या :
- “एकनाथ शिंदे मुखवटा खरी लढाई भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्यात”
- BJP | “काँग्रेसने सावरकरांचा खुळखुळा केला, तर भाजपने स्वातंत्र्यवीरांचे खेळणे”; ठाकरे गटाचे गंभीर आरोप
- Nana Patekar | “एकनाथराव, आम्ही कर भरून आमच्या चौकशा, तुमच्या चौकशा का होत नाहीत?”; नाना पाटेकरांचा थेट सवाल
- Uddhav Thackeray | अंधेरी पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट ; उद्धव ठाकरेंना धक्का देण्याची तायरी
- BJP | ठाकरे गटाच्या ‘या’ बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल ; मोदींची नक्कल करणं पडलं महागात
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.