शौर्य आणि त्यागाची प्रेरणा देणारा शहीद वीर बाल दिवस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 26 : गुरू गोविंद सिंग यांनी देशासाठी, समाजाचे, संस्कृतीचे, धर्माचे रक्षण करण्यासाठी संपूर्ण कुटुंबाचे बलिदान दिले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानुसार गुरू गोविंद सिंगजी यांचे दोन पुत्र जोरावर सिंग आणि फतेह सिंग. या दोन साहेबजादे यांचे हौतात्म्य शहीद वीर बाल दिवसाच्या निमित्ताने आपण नेहमीच स्मरणात ठेऊयात, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त करून त्यांना नमन केले.

%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0 %E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2 %E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87 %E0%A4%94%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF %E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%A8 %E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5 %E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2 %E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87 %E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7 %E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87 %E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8 1 शौर्य आणि त्यागाची प्रेरणा देणारा शहीद वीर बाल दिवस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वीर बाल दिवसाचे औचित्य साधून गोरेगाव येथील गुरुद्वारामध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी आमदार विद्या ठाकूर, कार्यक्रमाचे राष्ट्रीय प्रभारी शक्ती सिंग, संयोजक किरण पाटील, सहसंयोजक सुरींदर सिंग पुरी, सहसंयोजक राणी द्विवेदी, गुरुद्वारा कमिटीचे पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0 %E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2 %E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87 %E0%A4%94%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF %E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%A8 %E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5 %E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2 %E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87 %E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7 %E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87 %E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8 2 शौर्य आणि त्यागाची प्रेरणा देणारा शहीद वीर बाल दिवस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की पुढील अनेक पिढ्यांपर्यंत आपल्याला गुरू गोविंद सिंगजी आणि त्यांचे दोन पुत्र जोरावर सिंग आणि फतेहसिंग यांच्याकडून प्रेरणा मिळत राहील. त्यांच्या हौतात्म्याची कहाणी आपल्या भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवणे, ही आपली जबाबदारी आहे. या शहीद वीर बाल दिनानिमित्त या दोन साहेबजादे यांना आणि आदरणीय गुरु गोविंद सिंग जी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या चरणी नतमस्तक होतो.

यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी गुरु गोविंद सिंगजी, त्यांचे दोन पुत्र साहेबजादे जोरावर सिंग आणि साहेबजादे फतेह सिंग यांच्या शौर्य तसेच संपूर्ण कुटुंबाच्या त्यागाची महती अधोरेखित केली.

000

संजय ओरके/विसंअ/

The post शौर्य आणि त्यागाची प्रेरणा देणारा शहीद वीर बाल दिवस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस first appeared on महासंवाद.