मुंबई, दि.१३: पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत यावर्षी होणाऱ्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या इमेलवर ३१ ऑगस्ट. २०२४ पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे.
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सन २०२४ च्या गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये स्पर्धा घेऊन विजेत्या मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे. या स्पर्धचे आयोजन करुन अभिप्रायासह गुणांकन करुन प्रस्तावास शासनास सादर करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समिती गणेश मंडळाच्या उत्सवस्थळी प्रत्यक्ष भेट देईल. जिल्हास्तरीय समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन देण्यात येणार आहे. तसेच गणेशोत्सव मंडळाची शिफारस करून त्यांची नावे, सर्व कागदपत्र व व्हीडीओसह राज्य समितीकडे सादर करण्यात येतील. निकालासंदर्भात स्वतंत्र सूचना देण्यात येतील.
000
संध्या गरवारे/विसंअ