सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सरळ सेवा नियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्राचे ७ मार्च रोजी वाटप

मुंबई, दि. 7 : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने  सरळ सेवा नियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम दि. 7 मार्च 2024, रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, चौथा मजला, मुंबई येथे होणार आहे. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत.

दि. 7 मार्च रोजी  सकाळी अकरा वाजता, होत असलेल्या या कार्यक्रमास, सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांची विशेष उपस्थिती राहणार असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर – म्हैसकर, सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे, सचिव बांधकामे संजय दशपुते यांची उपस्थिती असणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

००००

वंदना थोरात/विसंअ