सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत

मुंबई, दि. २५: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’  कार्यक्रमातून सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सज्ज’ या विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत शनिवार दि. २७ एप्रिल २०२४ रोजी आकाशवाणीची सर्व केंद्र तसेच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरुन सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित करण्यात येणार आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणुकीचे कामकाज पार पाडण्यासाठी सुरु असलेली कार्यवाही, मतदान केद्रे व मतमोजणी केंद्रावर करण्यात आलेली तयारी, मतदार जनजागृती, कायदा व सुव्यवस्थेचे नियोजन, मतदारांसाठी सोयीसुविधा आदींबाबत जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी माहिती दिली आहे. जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलंवत यांनी ही मुलाखत घेतली आहे.

०००

संध्या गरवारे/ वि.स.अ