सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

मुंबई,दि. 23 : नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे,माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही  नेताजी सुभाषचंद्र बोस, स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्प अर्पण करून अभिवाद केले.सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव र.रा.पेटकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कक्ष अधिकारी विजय शिंदे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित  होते.

0000

प्रवीण भुरके /ससं/