स्वातंत्र्यसैनिक पांडू मास्तर स्मारक कामाचा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याकडून आढावा

सांगली दि. २२ (जिमाका) स्वातंत्र्य सैनिक पांडू मास्तर उर्फ गोविंद पांडुरंग पाटील यांच्या वाळवा तालुक्यातील मौजे येडेनिपाणी येथील स्मारकाच्या कामाचा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज आढावा घेतला.

या स्मारक कामकाजसंदर्भात जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे  यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, वास्तु रचनाकार प्रमोद  चौगुले आदी उपस्थित होते.

या स्मारकाच्या कामासाठी मंजूर झालेला निधी, या निधीतून करण्यात आलेली कामे याबाबतची माहिती  पालकमंत्री डॉ. खाडे यांनी संबंधितांकडून जाणून घेतली. स्मारकाच्या उर्वरित कामासाठी आवश्यक निधीच्या मागणीबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना त्यांनी बैठकीत दिल्या.

०००