स्वीप अंतर्गत शिरपूर तालुक्यात मतदार जनजागृती रॅली उत्साहात

धुळे, दि. १७ (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगच्या निर्देशानुसार धुळे जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी अधिकाधिक वाढावी, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध स्तरावर प्रयत्न सुरु असून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8 %E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80 3 स्वीप अंतर्गत शिरपूर तालुक्यात मतदार जनजागृती रॅली उत्साहात

शिरपूर येथे प्रांतधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शरद मंडलिक, शिरपूरचे तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी महेंद्र माळी, शिरपूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. नीता सोनवणे यांच्या नियंत्रणाखाली संपूर्ण शिरपूर तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालय यांच्यामार्फत मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली.

%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8 %E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80 1 स्वीप अंतर्गत शिरपूर तालुक्यात मतदार जनजागृती रॅली उत्साहात

या रॅलीत ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’ मतदान करा, लोकशाही बळकट करा’ अशा घोषणा देत मतदान करण्याबाबत मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली.

%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8 %E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80 4 स्वीप अंतर्गत शिरपूर तालुक्यात मतदार जनजागृती रॅली उत्साहात

या रॅलीत शाळेचे बँड पथक, इयत्ता पाचवी ते दहावी मधील विद्यार्थी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते. या रॅलीस सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. एकाच दिवशी संपूर्ण शिरपुर तालुक्यात मतदार जनजागृती रॅलीच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली.

%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8 %E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80 6 स्वीप अंतर्गत शिरपूर तालुक्यात मतदार जनजागृती रॅली उत्साहात

 

%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8 %E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80 5 स्वीप अंतर्गत शिरपूर तालुक्यात मतदार जनजागृती रॅली उत्साहात

%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8 %E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80 7 स्वीप अंतर्गत शिरपूर तालुक्यात मतदार जनजागृती रॅली उत्साहात०००

The post स्वीप अंतर्गत शिरपूर तालुक्यात मतदार जनजागृती रॅली उत्साहात first appeared on महासंवाद.