हिंगोली येथे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण  

हिंगोली (जिमाका), दि. 01 :  येथील संत नामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक  जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  अनुप शेंगुलवार, राज्य राखीव पोलीस बलाच्या समादेशक पोर्णिमा गायकवाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, गणेश वाघ,  यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पंडीत अवचार यांनी केले. यावेळी पोलीस, राज्य राखीव दल, होमगार्ड पथक तसेच बँक पथकाने परेडचे शानदार संचालन केले. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नितीन तडस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मुणगल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कैलास शेळके, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ.राजेंद्र कदम यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.