२९- मुंबई उत्तर मध्य लाेकसभा मतदारसंघातील विधानसभेच्या तीन मतदारसंघासाठी राजिंदरसिंग तारा मतमोजणी निरीक्षक

मुंबई उपनगरदि. 2 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार 4 जून 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. 29- मुंबई उत्तर – मध्य या लोकसभा मतदारसंघातील 167- विलेपार्ले168- चांदिवली174- कुर्ला (एससी) या विधानसभेच्या मतदारसंघासाठी राजिंदरसिंग तारा (जम्मू- काश्मिर) यांची मतमोजणी निरीक्षक म्हणून भारत निवडणूक आयोगाने नियुक्ती केली आहेअशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.  श्री. तारा यांनी आज मतमोजणी केंद्राला भेट देऊन पाहणी केली. त्यांचा संपर्कासाठीचा पत्तासूट क्रमांक 121गेल अलायरेस्ट हाऊसदुसरा मजलाबीकेसीवांद्रे (पूर्व)मुंबई- 51 असा आहेतर संपर्क क्रमांक 94191-60922 असा आहे.

000