InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

राहुल गांधींचे ट्विटरवर 1 कोटी फॉलोअर्स, ट्वीट करून मानले आभार

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर काही काळ मीडियापासून दूर राहणारे राहुल गांधी पुन्हा सक्रीय झाले आहेत. नुकताच काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा देणाऱ्या राहुल गांधींनी एक ट्वीट करून आपल्या चाहत्यांचे आभार मानले. ट्विटरवर 1 कोटी फॉलोअर्स झाल्याबद्दल त्यांनी हे ट्वीट केले. तसेच राहुल गांधी बुधवारी अमेठी दौऱ्यावर आहेत. परंतु, एका बॉलिवूड प्रोड्युसर राहुल गांधींच्या या ट्वीटची खिल्ली उडवली. प्रोड्युसर अशोक पंडित यांनी राहुल यांच्या ट्वीटला रीट्वीट करून त्यावर आपली प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला.

फॉलोअर्सना तुमच्या कार्यक्षमतेवर विश्वास नाही -बॉलिवूड प्रोड्युसर
अशोक पंडित यांनी ट्वीट करून लिहिले, फॉलोअर्स कितीही वाढले तरी ते मतांमध्ये परिवर्तित होत नाहीत. ट्विटरवरील 1 कोटी फॉलोअर्सपैकी 99.99 लाख लोकांना तुमच्यावर एक नेते म्हणून काम आणि क्षमतेवर विश्वास नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे, राहुल गांधींवर निशाणा साधणारे अशोक पंडित हे अक्सिडेंटल  प्राइम मिनिस्टर’ चित्रपटाचे को-प्रोड्युसर होते.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.