भाजपचे आणखी १० मंत्री देणार राजीनामा? संजय राऊतांचा दावा

मुंबई : उत्तर प्रदेशच्या राजकारणात भूकंपाचे लागोपाठ धक्के बसत आहेत. सुरवातीला स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देत मंगळवारी भाजपला धक्का दिला होता. त्यानंतर योगी सरकारमधील दुसरे मंत्री दारा सिंह चौहान यांनी देखील राजीनामा देत भाजपवर नवा बॉम्ब टाकला होता. भाजपला दारा सिंह यांच्या रूपाने दुसरा मोठा झटका बसला आहे. त्यानंतर आता मौर्य यांचेच समर्थक आमदार मुकेश वर्मा यांनीही राजीनामा दिला आहे.

भाजपाला धक्कावर धक्के बसत असताना आणखीन एक मंत्री धरमसिंह सैनी यांनी राजीनामा दिला आहे. सैनी हे आयुषमंत्री होते. त्यांनी सरकारी सुरक्षेसह सरकारी निवासस्थानही सोडले आहे. सैनी हे स्वामीप्रसाद मौर्य यांचे निकटवर्तीय मानले जातात. गेल्या तीन दिवसांत भाजपच्या तीन मंत्र्यांनी तर चक्क ११ आमदारांनी पक्षाला राम राम ठोकला. हे चित्र पाहता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे.

उत्तरप्रदेशात भाजपाला मोठी गळती लागली आहे. ही फक्त सुरुवात असून राजीनाम्यांचा आकडा वाढतच जाईल. येत्या काळात आणखी १० मंत्री राजीनामा देऊ शकतात. तुमचे मंत्रीच राजीनामा देत असतील तेव्हा वारा कोणत्या दिशेने वाहात आहे, ते समजून येते, असे वक्तव्य राऊत यांनी केले आहे. राऊत यांच्या वक्तव्यानंतर भाजपच्या गोटात खळबळ निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा