InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

ट्रॅक्टरच्या धडकेत 11 वर्षीय बालकाचा मृत्यू

मलनिस्सारण योजनेच्या कामावरच्या ट्रॅक्टरच्या धडकेत 11 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी शहरातील गांधीनगर परिसरात घडली. यावेळी जखमी बालकाला नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार दरम्यान मृत्यू झाला. मृत बालकाचे नाव आदित्य बैस आहे. ट्रॅक्टरचालक मात्र घटनेनंतर पसार झाला.

शहरातील विविध भागात मलनिस्सारण योजनेचे काम सुरू आहे. भूमिगत मलनिस्सारण सिमेंटचे रस्ते जागोजागी खोदण्यात आले आहे. शहरात अपघाताची मालिका सुरूच आहे. शनिवारी सायंकाळी वाणे यांच्या दवाखान्याजवळ मलनिस्सारण योजनेच्या कामावर गिट्टीचा ट्रॅक्टर आला होता. दरम्यान 11 वर्षीय आदित्य बैस हा सायकलने जात होता. एवढ्यात ट्रॅक्टरने चिमुकल्याच्या सायकल जोरदार धडक बसली.

गंभीररीत्या जखमी झालेला आदित्य रस्त्यावर पडला. ट्रॅक्टरचालक लगेच घटनास्थळावरुन फरार झाला आहे. नागरिकांनी बालकाला सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. गंभीर जखमी झाल्याने आदित्यला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान आदित्यचा मृत्यू झाला.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply