InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

पाय घसरून विहिरीत पडल्यामुळे 12 वीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू

- Advertisement -

शेतातील काम करीत असताना अचानक पाय घसरून विहिरीत पडल्याने 12 वीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पाचोड येथील अडुळतांडा येथे घडली आहे. पूजा बाबासाहेब राठोड (वय-17)असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की,पूजा दुपारी शेतात काम करण्यासाठी गेली होती. शेतातील विहिरीजवळ ती काम करत होती. चिखलामुळे पूजाचा पाय घसरला आणि ती थेट विहिरीत पडली. विहीर ही सुमारे 65 फूट खोल असून त्यात 50 फूटापेक्षा जास्त पाणी आहे. पोहता येत नसल्याने तिचा बुडून मृत्यू झाला.

Loading...
Related Posts

लहान मुलाबरोबर कुस्ती खेळल्यावर पैशांऐवजी रेवड्या मिळतात, शरद…

- Advertisement -

बराच वेळ झाला पूजा शेतात दिसत नसल्याने नातेवाईकांनी तिचा इतर ठिकाणी शोध घेतला. परंतु ती दिसली नाही. विहिरीच्या जवळ पाय घसरल्याच्या खुणा दिसल्याने नातेवाईकांनी विहिरीत डोकाऊन पाहिले असता पूजा मृतावस्थेत दिसली. गळ टाकून पूजाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या प्रकरणी पाचोड पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.