13 वर्षाच्या फॅनची माधुरीला मागणी; माधुरीने शेअर केली तिची रिॲक्शन

मुंबई : बॉलिवुडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित चाहत्यांशी सोशल मिडियाद्वारे नेहमी संवाद साधताना दिसते. एका 13 वर्षाच्या चाहत्याने माधुरीला ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत माधुरीला आयुष्यात एकदा तरी भेटण्याची इच्छ प्रकट केली आहे. त्यावर माधुरीने रिॲक्शन दिली आहे.

फॅनने ट्विटमध्ये माधुरीला टॅग करत लिहलं आहे की, “माधुरी मॅम, मी तुमची खुप मोठी चाहती आहे. तुम्ही ज्या प्रकारे पडद्यावर अभिनय करतात स्वत:च्या भावना व्यक्त करतात ते मला खुप आवडतं. तुम्ही प्रत्येक भुमिकाअगदी सुंदरतेने निभावतात. ते अगदी कमाल आहे. मला तुमचा डांसदेखील पसतं आहे. तुम्ही खुप आनंदी राहा. कदाचित मी तुम्हाला भेटू शकले असते” आणि यासोबतच त्याने माधुरीला “क्वीन ऑफ एक्सप्रेशन” चा ख़िताब दिला. आपल्या फॅनच्या पोस्टला रिप्लाय देत माधुरीने लिहले आहे की, “आशा आहे आपण एक दिवस नक्कीच भेटू” तसेच रेड हार्ट इमोटिकॉन्स सेंड केले आहेत.

माधुरीची सोशल मीडीयावर प्रचंड मोठी फॅन फॉलोईंग आहे. सध्या माधुरी रियलिटी टीवी शो  ‘डांस दीवाने 3’ जज करत आहे.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा