InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

लालबागचा राजाच्या परिसरात १३५ मोबाईल चोरी…

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात विराजमान झालेल्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांच्या रांगा लागल्या आहेत. मात्र ‘लालबागचा राजा’ परिसरात संधीसाधू चोरट्यांनी भक्तांचे खिसे कापणंही सोडलं नाही. गेल्या चार दिवसात पोलिसांनी तब्बल 135 मोबाइल चोरीच्या तक्रारी नोंद केल्या आहेत. मुंबईतील लालबाग परिसरात ‘लालबागचा राजा’चे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी रिघ लागते. गर्दीचा फायदा घेत चोरटे आपला हेतू साध्य करताना दिसत आहेत. काळाचौकी पोलिस ठाण्यात चार दिवसात तब्बल 135 मोबाईल चोरीच्या तक्रारी नोंद केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.