मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी ३६ पैकी १४ वसतीगृहे सुरु; अशोक चव्हाणांनी दिली माहिती

मुंबई : सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर आता राज्यातील मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने ३६ वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतला होता. त्यातील 14 वसतिगृह तयार झाली असून लवकरच ही वसतिगृह सुरू करण्यात येणार आहेत. जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते या इमारतींचं उद्धाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

छत्रपती शाहू महाराज संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणजेच सारथीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचं देखील अशोक चव्हाणांनी सांगितलं आहे. संस्थेसाठी 150 कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याचं चव्हाणांनी सांगितलं. तर मराठा आंदोलकांवर दाखल केलेल्या खटल्यांपैकी 199 खटले मागे घेण्यात आले आहेत. तर, 109 खटले मागे घेण्यासाठी न्यायालयाला विनंती देखील करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

तसेच सोशल मिडीयावर पोस्ट करत त्यांनी सांगितले की, ‘मराठा समाजासाठीची ३६ पैकी १४ वसतीगृहे सुरु करण्याची सर्व पूर्तता झाली असून येत्या १५ ऑगस्टला त्यांचे उद्घाटन करण्याचा मानस आहे. तसेच सारथीची ८ कार्यालये उभारण्याचा निर्णय आधीच झाला असून जागेच्या संदर्भात काही अडचण असल्यास महसूलमंत्र्यांच्या स्तरावर बैठक घेऊन तो विषय सोडवला जाईल’ असे ते म्हणले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा