पुण्यात १४ वर्षाच्या मुलीचा खून; नात्यातील तरुणानेच कोयत्याने वार करून केली हत्या

पुणे : पुण्यातल्या बिबवेवाडी परिसरात आठवीत शिकणाऱ्या एका कबड्डीपटूची हत्या करण्यात आली. कोयत्याने वार करत या कबड्डीपटूची निर्घृण हत्या करण्यात आली. प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलीय. बिबवेवाडी परिसरात एका मुलीचा नात्यातील तरुणाने कोयत्याने वार करून खून केला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली.

क्षितीजा व्यवहारे (वय १४) असे खून झालेल्या मुलीचं नाव आहे. याबाबत माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनीही तात्काळ या प्रकरणाची दखल घेत आरोपीला शोधण्यासाठी यंत्रणा कामाला लावली. क्षितीजा व्यवहारे कबड्डी खेळाडू होती. बिबवेवाडी येथील यश लॉन्स येथे ती मित्रांसोबत कबड्डी खेळण्यासाठी आली होती. त्यावेळी तिच्या नात्यामधील तरुण त्या ठिकाणी आला.

यानंतर त्याने तिला बाजूला घेऊन जात तिच्याशी बोलण्यास सुरुवात केली. मात्र तेव्हा दोघांमध्येही वाद झाले. त्यावेळी तरुणाने सोबत आणलेल्या कोयत्याने तिच्यावर केले. हा प्रकार घडला त्या ठिकाणी इतरही तरुण-तरुणी कबड्डी खेळत होते. हा सर्व प्रकार पाहून सगळे घाबरून पळाले. या घटनेची माहिती मिळातच बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच खुनाचा गुन्हा दाखल करून चौकशीस सुरवात केली.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा