InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मंगरुळपीर तालुक्यातील १७ हजार शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनाच्या प्रतिक्षेत

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनअंतर्गत तालुक्यातील जवळपास २५ हजार शेतकरी पात्र असतांना केवळ साडेसात हजार कास्तकारांनाच प्रत्यक्ष योजनेचा लाभ मिळाला आहे. उर्वरीत जवळपास १७ हजार कास्तकार योजनेच्या लाभाच्या प्रतिक्षेत असुन सर्व कास्तकारांना तातडीने लाभ मिळावा अशी मागणी पं.स. सदस्या  रफीका बानो युनूस खान व सामाजिक कार्यकर्ते युनूस खान यांनी केंद्रीय कृषि मंत्र्यांना निवदेनाद्वारे केली आहे. मंगरूळपीर तालुक्यातील २ हेक्टर किंवा त्यापेक्षाकमी जमीन असलेले १४२०० शेतकरी तर २ हेक्टरपेक्षा अधिक जमीन असलेले ६९०० जवळपास २१०० कास्तकार योजनेस पात्र आहेत.

मंगरूळपीर तालुक्यातील जवळपास २५ते ३० हजार शेतकरी या योजनेसाठी पात्र असल्याचे कळते. असे असतांना आतापर्यन्त केवळ साडेसात हजार शेतक-यांच प्रत्यक्ष या योजनेचा लाभ मिळाला आहे. उर्वरीत कास्तकार अजुनही योजनेच्या लाभाची वाट पाहत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply