2 वर्षांची चिमुरडी गातेय लतादीदींचं गाणं, रानू मंडललाही टाकलं मागे!

हल्ली सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. अनेक जण आपले व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर शेअर करतात आणि बघबघता तो व्हिडिओ हीट होऊन जातो. अलीकडे रानू मंडल यांचा व्हिडिओ असाच व्हायरल झाला होता. आज रानू मंडल रातोरात स्टार झाल्या आहे. रानू यांनी लता मंगेशकर यांचं गाणं गाऊन सर्वांची वाहवाह मिळवली होती. आता आणखी एक असाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पण, हा व्हिडिओ आहे अवघ्या 2 वर्षांच्या मुलीचा आहे.

ही 2 वर्षांचा मुलगी लता मंगेशकर यांनी गायलेलं प्रसिद्ध गान ‘लग जा गले’ गात आहे. हे गाणं 1964 मध्ये आलेल्या वो कौन थी   या चित्रपटातील आहे. या मुलीचं नाव आहे प्रज्ञा मेधा. या चिमुरडीने अत्यंत सुमधूर आवाजात हे गाणं गायलं आहे.

View this post on Instagram

#Musicon #lagjagale? #latamangeshkarji ???#babygirl?

A post shared by Pragya Medha (@pragyamedha11) on

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.