२०१८ ठरले बायोपिकचे वर्ष; ‘या’ व्यक्तींच्या जीवनगाथा रुपेरी पडद्यावर

२०१८ हे बॉलिवूडमधील बायोपिकचे वर्ष ठरले. या वर्षात अनेक प्रेरणादायी व्यक्तिंचा प्रवास रुपेरी पडद्यावर उलडगण्यात आला. तसेच प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि प्रेम दोन्ही मिळाले. एक नजर टाकूया २०१८मध्ये रिलीज झालेल्या बायोपिकवर.

पॅडमॅन 

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं पॅडमॅन सिनेमात मुरुगनंथम यांची भूमिका साकारली. अरुणाचलम मुरुगनंथम यांनी जगभरात पॅडमॅन नावाने ओळखले जाते.

संजू

या सिनेमातून  संजूबाबाचे आयुष्य मोठ्या पडद्यावर मांडण्यात आले. संजय दत्तची भूमिका यात रणबीर कपूरने साकारली. संजय दत्तच्या आयुष्यातली अनेक चढ-उतार या सिनेमात दाखवण्यात आले होते.

सुरमा  

आंतरराष्ट्रीय हॉकीपटू संदीप सिंगच्या आयुष्याची कथा या सिनेमात दाखवण्यात आली. मृत्यूच्या दारात नेणा-या एका प्रसंगामुळे त्याने आयुष्यातील दोन वर्ष व्हीलचेअरवर काढली. मात्र प्रचंड जिद्द, मेहनत आणि खेळाची निस्सिम आवड या जोरावर तो पुन्हा उभा राहिला. त्यानंतर त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २००९ सुलतान अझलान शॉ कप जिंकला. संदीपची भूमिका दिलजीत दोसांझने साकारली होती.

मंटो

‘मंटो’ हा सिनेमा दिग्गज लघुकथा लेखक सआदत हसन मंटो यांच्या आयुष्यावर बेतलेले बायोपिक होता. यात नवाजुद्दीन सिद्दीकीची मुख्य भूमिका होती. नंदिता दास हीचा हा महत्त्वाकांक्षी सिनेमा होता. मंटोच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू, भारताचा स्वातंत्र्य संग्राम, फाळणीनंतरचे राजकारण, त्यानंतर उमटलेले पडसाद व या सगळ्यांचा मंटोच्या साहित्यावरचा प्रभाव हे सगळे नंदिता दासने सिनेमात दाखवले होते.

महत्वाच्या बातम्या –

 

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.