२४ जानेवारी : राष्ट्रीय बालिका दिवस , जाणून घ्या

 

भारतामध्ये राष्ट्रीय बालिका दिवस हा दरवर्षी 24 जानेवारी रोजी साजरा केला जातो.महिला व बाल विकास मंत्रालय आणि भारत सरकारने २००८ साली कॉंग्रेसच्या शासनकाळात हा दिवस साजरा करण्यास सुरवात केली.भारतात कुटूंबापासून ते समाजापर्यंत सर्व ठिकाणी मुलींविरूद्ध लैंगिक भेदभाव आणि पक्षधरता चालविली जाते आणि त्याचबरोबर मुलींना समान संधी व जास्तीत जास्त सुविधा व आधार मिळावा हा मुख्य हेतू बालिका दिन साजरा करण्यामागे आहे. या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम शाळा ,महाविद्यालय आणि इतर ठिकाणी आयोजित केले जातात यामध्ये  बेटी बचाओ बेटी पढाओ सारखे अनेक संदेश दिले जातात. मुलीचे हक्क , आरोग्य , पोषण , शिक्षण , लग्न अशा अनेक गोष्टींची माहिती या कार्यक्रमांध्ये दिली जाते.

सचिन तेंडुलकर होणार ऑस्ट्रेलियन संघाचा कोच , कारण वाचून बसेल धक्का

Loading...

आज आपण आजूबाजूला पाहतो कि २१व्या  शतकात देखील मुलींना अमानुष , गैर प्रकारची वागणूक मिळते आहे. कोवळ्याशा जीवावर अत्याचार केले जातात. आजच्या दिवशी  लोकांमध्ये जनजागृती करण्याचे केले जाते. महिला,बालिका , तरुणी यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये समानतेचा भाव निर्माण करण्याचे काम आज केले जाते.भारत सरकारने मुलींच्या जन्मदरात वाढ होण्यासाठी , मुलींच्या शिक्षणाला चालना मिळण्यासाठी,मुलींना उच्च शिक्षण मिळावे यासाठी तसेच त्यांना रोजगाराच्या संधी उपब्लध व्हाव्यात अशा प्रत्येक अनेक गोष्टींसाठी वेगवेगळ्या योजना तयार केल्या.

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खायला हवा चिकू !

जेव्हा समाजातील प्रत्येक स्त्रीचा सन्मान करून तिला योग्य प्रकारे  वागणूक मिळेल. फक्त  बालिका दिवस, महिला दिवस यापुरतीच हा सन्मान आणि चांगली वागणूक मर्यादित न ठेवता येणाऱ्या प्रत्येक दिवशी जर का तुम्ही समाजातील प्रत्येक स्त्रीला सन्मान दिलात तर नक्कीच हा समाज भक्कमरित्या तयार होईल.

 

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.