मुंबई शहर जिल्ह्यात २४ लाख ५७ हजार मतदार

मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा – जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे

मुंबई – भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दि.10 मार्च रोजी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2019 ची घोषणा केली असून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.   मुंबई शहर जिल्ह्यात 30 मुंबई दक्षिण- मध्य व 31 मुंबई दक्षिण हे दोन लोकसभा मतदारसंघ असून 24 लाख 57 हजार 26 पात्र मतदार आहेत. मुंबई शहर जिल्ह्यात सोमवार, दि. 29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात मतदान होईल व सोमवार, दि. 23 मे  रोजी मतमोजणी होणार आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा  जिल्हा निवडणूक अधिकारी,  शिवाजी जोंधळे यांनी केले आहे.

2601 मतदान केंद्र व 35 हजार कर्मचारी

Loading...

दिनांक 31 जानेवारी,2019 रोजी प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीनुसार एकूण 24 लाख 56हजार 497  मतदार आहेत. त्यामध्ये पुरुष मतदार 13 लाख 44 हजार 955 व स्त्री मतदार11 लाख 11 हजार 437 इतर 105 आहेत. यात 18 ते 19 वयोगटातील मतदार 17 हजार404 असून 80 वयापेक्षा अधिक असे 1 लाख 35 मतदार आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यात एकूण 2601 मतदान  केंद्र आहेत. लोकसभेची निवडणूक प्रकिया पूर्ण करण्यासाठी साधारणत: 35 हजार कर्मचारी कार्यरत असतील.

टोल फ्री क्रमांक

आचारसंहिता तसेच निवडणूक खर्चाचे पर्यवेक्षण करण्यासाठी 40 फिरती पथके – (Flying Squad) 30 स्थिर देखरेख पथके (Static Surveillance Team) 20 पथके (Video Surveillance Team) व 11 दृकश्राव्य चित्रीकरण पथके (Video Viewing Team)विधानसभा मतदार संघनिहाय स्थापित करण्यात आलेले आहेत.

नवीन मतदार नोंदणीबाबत माहिती आवश्यक असल्यास तसेच आचारसंहितेचा भंग किंवा निवडणुकीच्या खर्चासबंधी तक्रारीबाबत मुंबई शहर जिल्ह्यासाठी तक्रार कक्षाचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक 1950 कार्यान्वित करण्यात आला आहे.

मीडिया सर्टीफिकेशन व मॉनिटरिंग कमिटी (MCMC)

केबल, दूरचित्रवाणी, सोशल मीडिया तसेच इतर दृकश्राव्य माध्यमांद्वारे प्रसारित करावयाच्या निवडणूक जाहिरातीची पडताळणी व परवानगीसाठी मीडिया सर्टीफिकेशन व मॉनिटरिंग कमिटी (MCMC)  स्थापन करण्यात  आली आहे.

लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

* निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक 02/04/2019 (मंगळवार)

* नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक 09/04/2019 (मंगळवार)

* नामनिर्देशन पत्राची छाननी दिनांक 10/04/2019 (बुधवार)

* उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 12/04/2019 (शुक्रवार)

* मतदानाचा दिनांक 29/04/2019 (सोमवार)

* मतमोजणी दिनांक 23/05/2019 (गुरुवार)

* निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक 27/05/2019 (सोमवार)

मुंबई शहर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघापैकी 6 मतदार संघ, 31 – मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघात तर उर्वरित 4 विधानसभा मतदार संघ, 30- मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघात आहेत. तसेच मुंबई उपनगर जिल्ह्यातील अणुशक्तीनगर व चेंबूर हे दोन विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी दिली.

मतदारसंघ व मतदान केंद्र

30- मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदार संघ, निवडणूक निर्णय अधिकारी शहाजी पवार,

अ.क्र.सहा.निवडणूक अधिकारी व विधानसभा मतदारसंघपुरुष मतदारस्त्री मतदारइतरएकूणमतदान केंद्र
1रवींद्र हजारे

178 -धारावी

1,39,2061,05,01902,44,225283
2अंजली भोसले

179- सायन कोळीवाडा

1,41,5261,09,040532,50,619267
3बी.जी.गावंडे

180- वडाळा

1,04,15395,13401,99,287224
4स्वाती कार्ले

181 – माहिम

1,17,1811,13,707322,30,920249

 

अ.क्र.सहा.निवडणूक अधिकारी व विधानसभा मतदारसंघपुरुष मतदारस्त्री मतदारइतरएकूणमतदान केंद्र
1पद्याकर रोकडे,

172 -अणुशक्तीनगर

1,31,6191,10,60422,42,297250
2ज्ञानेश्वर खुटवड

173 – चेम्बूर

1,31,6591,16,59532,48,257285

31 – मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी बन्सी गवळी

अ.क्र.सहा.निवडणूक अधिकारी व विधानसभा मतदारसंघपुरुष मतदारस्त्री मतदारइतरएकूणमतदान केंद्र
1सुषमा सातपुते

182 -वरळी

1,47,3611,17,07312,64,435243
2बाळा वाघमारे

183 -शिवडी

1,50,5361,23,66102,74,197259
3दादाराव दातकर

184 -भायखळा

1,29,4621,10,47972,39,948255
4किरण सुधाकर पाणबुडे

185-मलबार हिल

1,33,7551,21,77232,55,530277
5विश्वास गुजर

186 -मुंबादेवी

1,30,8511,07,14292,38,002249
6प्रशांत सुर्यवंशी

187 -कुलाबा

1,50,9241,08,41002,59,334295
एकूण13,44,95511,11,43710524,56,4972601

महत्त्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.