InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

जम्मू काश्मीरात बस अपघातात ३० यात्रेकरू ठार

जम्मू काश्मीरमधील किश्तवाड येथे बस अपघातात 30 यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. बस दरीत कोसळून झालेल्या अपघातामध्ये 30 यात्रेकरूंचा मृत्यू झाला तर 10 पेक्षा देखील जास्त जण जखमी झाले आहेत. स्थानिकांना याबाबतची माहिती मिळताच अपघातस्थळी धाव घेत मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात येत आहे. बस वेगात असल्यानं चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस दरीत कोसळून अपघात झाला. अपघातग्रस्त बसमध्ये 40 जण प्रवास करत होते. या अपघातात चालकाला देखील आपला जीव गमवावा लागला आहे. अपघात एवढा भीषण होता की, आवाजावरून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनानं देखील मदतकार्याला सुरूवात केली आहे.

 

महत्वाच्या बातम्या 

‘एक हजार कोटींची भीक नको; धनगर आरक्षण द्या’ 

घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये कमाल घट

वरुणराजाचा आठवडाभर राहणार महाराष्ट्रात मुक्काम 

मालगाडीचे डबे रुळावरून घसरल्याने मुंबई-पुणे वाहतूक विस्कळीत

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply