धक्कादायक- सत्तेचा खेळ सुरू असताना राज्यात ३०० शेतकऱ्यांच्या आत्महत्या

सत्ता स्थापनेसाठी खेळ सुरू असताना राज्यात मात्र ३०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती राज्याच्या महसूल विभागाने उघड केली आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून गेल्या चार वर्षातील आकडेवारीच्या तुलनेत एका महिन्यात शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा हा आकडा सर्वाधिक आहे. यापूर्वी २०१५मध्ये महिन्याभरात ३००हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं उघड झालं होतं.

मराठवाड्यात नोव्हेंबरमध्ये १२० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून त्यापाठोपाठ विदर्भात ११२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यात २०१९ मध्ये एकूण २५३२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. तर २०१८मध्ये हा आकडा २५१८ इतका होता.

अवकाळी पावसामुळे ७० टक्के खरीप पिकांचं नुकसान झालं आहे. यापूर्वी २०१५मध्ये राज्यात ३०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. तर गेल्या वर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण ६१ टक्क्यांनी वाढल्याचंही महसूल विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे.

अवकाळी पावसामुळे पपईच्या बागांचे नुकसान

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.