InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ३९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

कर्ज व सावकारी ओझ्याखाली दबलेले शेतकरी ऐन पावसाळ्यातही आत्महत्या करत आहेत. गेल्या १४ दिवसांत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ३९ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले.
जगाचा पोशिंदा असलेला बळीराजाच्या आत्महत्यांचे सत्र मराठवाड्यात थांबण्यास तयार नाही. १६ ते ३० जून या कालावधीत मराठवाड्यातील ३९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

गेल्या दोन आठवड्यात सर्वाधिक नऊ आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या असून त्या खालोखाल औरंगाबाद सात, नांदेड सहा आणि जालना जिल्ह्यातील पाच शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली. परभणी, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यात प्रत्येकी चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. जानेवारी ते ३० जून २०१९ या सहा महिन्यांत ४३४ शेतकरी आत्महत्यांची नोंद शासनाकडे करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply